"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

कथा माझ्या पहिल्या शाळेची

              


                 माझ्या शाळेचे नाव जि.प.प्राथमिक शाळा अंधारमळा केंद्र गल्ले बोरगाव त. खुलताबाद जि. औरंगाबाद असे असून माझी ही शाळा गल्ले बोरगावच्या नैॠत्य दिशेला गल्ले बोरगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेली आहे. या शाळेवर माझी प्रथम नेमणूक दि.५/१/२०११ होती. माझी ही शाळा सुरुवातीला वस्तीशाळा म्हणून उदयास आली आणि नंतर तिचे रुपांतर जि.प. शाळेमध्ये झाले .या माझ्या शाळेची पटसंख्या कमी असल्यामुळे या शाळेवर दोन शिक्षकांची नेमनुक करण्यात आली त्यामध्ये मी श्री.वाघमारे राहुल गंगाधर [तेलूर ता. कंधार जि. नांदेड ] व दुसरे शिक्षक श्री. प्रवीण विनायक ढोणे [मेंढेपठार ता. काटोल जि. नागपूर ] अशी ही लहान स्वरुपाची आमची शाळा.

                 माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मी सकाळी ९ वाजता माझ्या शाळेच्या दिशेने निघालो मनात असंख्य विचाराचे वादळ फिरत होते. वाटत होते कि माझी शाळा कशी असेल ? तेथील विद्यार्थी कसे असतील ? गावातील पालक वर्ग कसा असेल ? असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात घोळत होते. आणि माझे पाऊल माझ्या शाळेच्या दिशेने चालतच होते. रस्त्याने जाताना अनेक व्यक्ती भेटायचे ,नमस्कार-चमत्कार व्हायचा आणि नंतर विचारायचे कि ,पाहुणे तुम्हाला येथे कुणाच्या घरी जायचे आहे? बिचार्या त्या लोकांना काय माहिती कि मी शिक्षक आहे ते.मग मी म्हणायचो कि मी इथल्या शाळेवर शिक्षक म्हणून आलो आहे .त्यावेळी ते म्हणायचे कि, अस आहे का? सारे या ना मग चहा घ्यायला ? त्यावर मी म्हणायचो नको आता आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे मला माझ्या शाळेवर लवकर गेल पाहिजे चहा घेऊ नंतर कधीतरी.आता आहे येथेच तुमच्याच शाळेत अस म्हणत मी पुढे जायचो .. चालता –चालता मला एक मारुतीचे मंदिर दिसले तेथे कांही मुले खेळत होती.मला वाटले आता शाळा येथेच कुठेतरी जवळ असणार , मी मंदिराजवळ गेलो तेथे माझे सहकारी शिक्षक ढोणे सर माझ्या आगोदरच गेलेले होते . मी त्यांना पहिलो गुड मार्निंग वगैरे झाल. मी म्हणालो सर आपली शाळा कुठे आहे ? मंदिरात दर्शनाला आलात कि काय ? त्यावर ढोणे सर म्हणाले , कि आपली शाळा हीच आहे इथ मंदिरांच्या व्हरांड्यामध्ये . कारण त्यांना सुद्धा पहिल्या दिवशी असच वाटल असाव. मी जवळपास १ महिना प्रा.शा. बोडखेवस्ती व केन्द्र प्रा. शा. गल्ले बोरगाव येथे डेपोटेषणवर असल्यामुळे माझा हा शाळेतील पहिलाच दिवस होता. ढोणे सर मात्र या शाळेवर जुने झालेले होते म्हणून त्यांच्याकडे मु.अ.चा चार्ज आलेला होता. 

                मग ढोणे सरांनी सर्व  मुलांना माझा परिचय करून दिला नंतर मुलांनी पण त्यांचा परिचय मला करून दिला . एकदाची शाळा सुरु झाली . सर्व विद्यार्थी माझ्याकडे एका आतुरलेल्या भावनेने पाहत होते. त्या प्रत्येकाना  वाटत असाव कि, हे सर कुणाला शिकवणार आहेत. मग ढोणे सरांनी माझ्याकडे १ ली आणि ३ री वर्ग दिला.आणि त्यांच्याकडे २ री व ४ थीचा वर्ग अशी वर्गाची विभागणी करून आम्ही आपापले वर्ग घेऊन शिकवायच्या तयारीला लागलो.आता प्रश्न पडला कि,एकाच व्हरांड्यामध्ये चार वर्गांचे अध्यापन  करायचे कसे? त्यावर ढोणे सरांनी एक तोडगा काढला ते म्हणाले कि, सर तुम्ही आत व्हरांड्या वर बसा मी माझा वर्ग घेऊन बाहेर झाडाखाली बसेन. मग आम्ही तसेच केले.जेव्हा प्रत्यक्ष वर्ग सुरु झाला तेंव्हा पुन्हा एकदा मी सर्वाना माझा परिचय करून देऊन प्रत्येक मुलांना त्याचं नाव विचारायचो .त्यावेळी त्या मंदिरामध्ये हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी कित्येक व्यक्ती यायचे ,घनता वाजवायचे ,मंदिरात जायचे ,देवाचे दर्शन घ्यायचे ,परत येताना घनता वाजवून बाहेर पडायचे . त्यावेळी सर्व मुलांचे लक्ष हे त्या दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीकडे असायचं , आता त्याना तरी मी कस सांगणार कि, तिकडे पाहू नका माझ्याकडे लक्ष द्या आस. कारण माझ पण लक्ष त्यांच्याकडे जायचं . कारण त्य मंदिरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची दर्शन घेण्याची पध्दत वेगवेगळी असायची अस करता –करता दुपारची जेवणाची वेळ झाली. त्यावेळी खिचडी त्या मंदिरात शिजवण्याची व्यवस्था नव्हती . ती खिचडीवाली ताई तीच्या घरूनच खिचडी करून आणत असे . एकाही विद्यार्थ्याला जर ती ताई खिचडी घेऊन येताना दिसली रे दिसली कि, तो विद्यार्थी खिचडी आली रे खिचडी आली . सर जेवायला सोडा ना खिचडी आली. .

                  मग जेवण्यासाठी शाळा सुटली सर्वांनी हात धुवून व्हरांड्यामध्ये रांगेत जेवायला बसले .सार्वजन विचारायचे कि सर तुमचा डब्बा कुठे आहे ? कारण ही मुले सरांचा डब्बा घेवून सरांजवळ जेवायला बसण्यासाठी धडपडत असतात . मग आम्ही म्हणालो कि अरे आम्ही डब्बा आणला नाही . मग सर्व मुले आपापला डब्बा उघडून बसली , ज्यांनी डब्बा आणला नव्हता त्यांनी प्लेट धुवून खिचडी घेवून रांगेत बसली .मग खिचडीवाल्या ताईनी दोन प्लेट मध्ये आम्हा दोघांना खिचडी दिली . आम्हीही जेवण्यासाठी मुलांच्या रांगेत बसलो . त्यावेळी प्रत्येक मूल म्हणायचं कि सर माझ्या डब्यातला एक घास खा , माझ्या डब्यातला एक घास खा. मग आम्ही दोघेही प्रत्येक मुलांकडे जाऊन त्यांच्या डब्यातील एकेक घास घ्यायचो, प्रत्येक मुलांच्या डब्यातील एका घासाची चव ही काही न्यारीच होती .आम्ही दोघांनी त्या प्रत्येकाचा एकेक घास खाल्याशिवाय त्या मुलांनी कोणीही जेवायला सुरुवात केलेली नव्हती .मुलाचं हे असं वागण पाहून आम्हाला तर त्य मुलांविषयी खूपच आपुलकी वाटायला लागली .एकदाचे जेवण झाले . मुले बाहेर मस्त आनंदानी खेळू लागली आणि आम्ही दोघेजण गप्पा मारत बसलो.त्या शाळेविषयीच्याच. 

             दुपार नंतरची शाळा भरली. इथे काय शाळा भरण्यासाठी व शाळा सुटण्यासाठी बेल नव्हती. फक्त मोठ्याने आम्ही म्हणायचो कि,चला मुलानो शाळा भरली . लगेच सर्व मुले व्हरांड्यात बसली. आता मात्र बाहेर झाडाखाली बसण्याचा नंबर माझा होता .मग मी लगेच माझे विद्यार्थी घेवून बाहेर झाडाखाली बसलो . मधून –मधून बाहेर रस्त्यावर वाहने यायची .वाहन आले कि सर्व मुलांचे लक्ष त्या वाहनाकडे जायचं . परत त्यांना मी पाठाकडे वळवण्याचा प्रयत्न करून मी अध्यापनाला सुरुवात करायचो .तेवढ्यात अजून एखाद वाहन यायचं परत मुलाचं लक्ष विचलित व्हायचं , मनाला वाटायचं कि, असंच जर दर रोज वर्षानुवर्ष असेल तर मुलांची प्रगती कशी व्हायची. ही शाळा भरण्याची जागा बदलली पाहिजे असा विचार मनात येऊ लागला . एकदाचा घड्याळाचा काटा ४ वर आला आणि शाळा सुटली . सर्व मुले आम्हाला आनंदाने बाय-बाय सर अस म्हणून हात हालवत होती. आम्हीही त्यांना बाय- बाय म्हणत होतो. मग आम्ही दोघे रस्त्याने चालत होतो शाळेपासून गल्ले बोरगावला जाण्यासाठी घड्याळ फक्त अर्धा तासच पुढे जाते एवढे हे अंतर होते. 

            अशा प्रकारे आमचा दर रोजचा दिनक्रम सुरु होता. एके दिवशी कळले कि माझ्या शाळेच्या ईमारतीसाठी  श्री.एकनाथ सांडू वीर यांनी ६ गुंठे जागा दान दिली आहे आणि त्या ठिकाणी शाळेची इमारत उभी राहणार आहे. हे ऐकल्यावर माझ्या मनाला थोड बर वाटलं . शाळा लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही दोघे सर्वोतोपरी प्रयत्न करत होतो. आम्हाला मंदिरामध्ये शाळा भरवून एक-दीड वर्ष झाला असाव लगेच मंदिराच्या जवळच बाजूला शाळेची इमारत उभी झाली.आणि आम्ही जून महिन्यामध्ये या नवीन शाळेमध्ये स्थलांतरित झालो. आता आम्हा दोघांना दोन स्वतंत्र खोल्या होत्या स्वतंत्र कार्यालय होते. आम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते आम्हाला आता मिळाल होत . आम्ही आता मनाशी पक्का विचार केला कि, मुलांसाठी आता खूप वेळ द्यायचा त्यांची प्रगती हेच ध्येय मनाशी बाळगून आम्ही त्या दिशेने वाटचाल सुरु केलीआणि मुलांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि खरोखरच आमचे विद्यार्थी खूप चांगली बनली . नंतर –नंतर मुलांना शिकवत-शिकवत ,कधी अभ्यास देत शाळेची रंग रंगोटी केली , शाळा ज्ञान रचनावादी पध्दतीने सजवण्यात आली . हीच शाळा जेव्हा एकेकाळी एका मंदिरात भारत होती आणि आज तीच शाळा आय.एस.ओ.च्या दिशेने वाटचाल करत आहे. आमच्या शाळेत लोका वर्गणीमधून प्रोजेक्टर बसवण्यात आले. आमची शाळा हळूहळू आय.एस.ओ. मानांकानाकडे जात आहे. आम्हाला विश्वास आहे कि,एके दिवशी याच मंदिरात भरणार्या शाळेला आय.एस.ओ.मानांकन मिळेपर्यंत आम्ही दोघेही प्रयत्न करत राहणारच..........                                                                                                                                                            .                                                                                                                                                                  आपलाच ,                                                                    श्री वाघमारे राहुल गंगाधर                                                                     [मुख्याध्यापक ]                                                                                                                                                       जि.प.प्रा.शा.अंधारमळा. 

===========================================================


                        

1 टिप्पणी: