"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

माझ्या स्वयंरचित कविता






                    ईच्छा      


तुझ्या मनात तुडूंब भरलेले गरीबींचे दु:ख
मला दिसत आहे तूझ्या
नयनातून वाहणार्या अश्रूमधून  //1//

तूझ्यातील गरीबीशी दोन हात करण्याचे धैर्य
व त्यावर मात करण्याचे शौर्य
मला उमजत आहे
तूझ्या कष्ट करण्याच्या जिद्दीमधून  //2//

 तूझ्या लेकरांनी खूप शिकावं
आपल जीवन सुखांनी जगावं
अशी तूझ्या मनाची प्रबळ ईच्छा
मला खुणावत आहे तूझ्या
माझ्याकडे पाहणार्या आशेच्या नजरेमधून  //3//

तूझ्या मनातील असंख्य प्रश्नांचा ज्वालामुखी
धगधगताना मला जाणवत आहे
दिवसभरांच्या निघालेल्या कष्टाच्या घामामधून  //4//

तूझ्या घामाची खरी किंमत
मला कळत आहे
तूझ्या निघणार्या तळहाताच्या
फोडाच्या पाण्यामधून  //5//

सांग आई तूझ्या या फोडाला
कोणत औषध -मलम देऊ आणून?
तेंव्हा मला म्हणते माझी आई
बाळा याला कोणत औषध-मलम लागत नाही
याला लागते ते फक्त
तूझ्या सुखी,आनंदी जीवनाचं समाधान  //6//

                             
श्री. वाघमारे आर.जी.
                              mob. 8975735458




 

 आनंदाश्रूंचा महापूर    

 भरमसाठ प्रश्नांचा वाहतोय पूर
तरी कंठातून एकही शब्द फुटेना
खंगले मन गरीबीच्या तनावाने
तरी सुखाचे स्वप्न डोळ्यातून हटेना //1//

तान्ह्यापणाचीच आहे गरीबी
दारिद्रयता कांही तिला सोडेना
श्रीमंतांचा तिला वाटतो हेवा पण
कुणाची चाडी करण तिच्या बुद्धीला पटेना//2//

पछाडली आहे या परिस्थितीने
तरी अखंड चालते दारिद्र्याच्या वाटेवरी
प्रतिक्षेत आहे ती सुखी मार्गाच्या पर
अजूनही दारिद्र्याचा मार्गच हटेना//3//

काळजी आहे तिला पिल्लांची तिच्या
माझ्यापरी जगणे नको नशिबी त्यांच्या
आडाणी होते जगले कसेतरी म्हणून
शिकविण्याची जिद्द तिच्या मनातून हटेना//4//

आता झालो आहे मी गुरूजी
लोक म्हणतात मला सर
तेंव्हा हर्षाभिमानाने आईचा माझ्या
 कसा येतो दाटून कंठ , भरून ऊर
आणि डोळ्यातून वाहतोय दोन्ही
 आनंदाश्रूंचा महापूर महा.. पूर.......//5//

                                   
श्री. वाघमारे आर.जी.
                                       [प्रा.शि.] 

                                  मो.८९७५७३५४५८ 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें