"शिक्षणवेध" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्व शिक्षकांचे,सुशिक्षित पालकांचे व विद्यार्थी मित्रांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे(प्राथमिक शिक्षक ) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता. माहूर जि.नांदेड. आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे.
html codesJavascript Codes
"शिक्षणवेध"हा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात लाॅंच झालेला पहिला ब्लॉग.
html codesJavascript Codes
या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.
html codesJavascript Codes

गुरुवार, 2 फ़रवरी 2017

माझ्या “शिक्षणवेध” ब्लॉगचे अनावरण

आज दि. २/२/२०१७  वार गुरुवार या दिवशी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथील सभागृहामध्ये  माझा नवीन ब्लॉग " शिक्षणवेध " चे [लॉन्चींग ] अनावरण मान्यवर श्री. मोगल साहेब [शिक्षणाधिकारी औरंगाबाद ] , श्री .कांबळे सर [प्राचार्य ,डायट वैजापूर ], तसेच श्री. केवट साहेब [गट शिक्षणाधिकारी खुलताबाद ] आणि श्री.शेख  नदीम सर [केंद्र प्रमुख गल्ले बोरगाव ] यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
त्यावेळी सभागृहामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी , शिक्षणविस्तार अधिकारी , सर्व तालुक्यातील केंद्रप्रमुख  , डायट चे प्राध्यापक , साधन व्यक्ती या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा शिक्षण वेध ब्लॉग लॉंच झाला . हे सर्व पाहून असे वाटत होते कि, मी रात्र --दिवस मेहनत घेऊन तयार केलेल्या ब्लॉग निर्मितिचे सार्थक झाले. त्यावेळी टिपलेली काहीं छायाचित्र  बाजूच्या " माझ्या ब्लॉगचे अनावरण " या gadget मध्ये दिसत आहेत .  












शुक्रवार, 27 जनवरी 2017

वाचन प्रेरणा दिन दि. १५ /१० /२०१६

दि. १५ /१०/२०१६ रोजी जि.प.प्राथमिक शाळा अंधारमळा , केंद्र गल्ले बोरगाव येथे आमच्या खुलताबाद तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री केवट साहेब व आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री नदीम सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री खंडूजी फुलारे शाळेचे मु.अ. श्री ढोणे सर व मी श्री वाघमारे सर आणि माझ्या शाळेतील माझे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला . त्यावेळी न राहवता घेतलेले  काहीं छायाचित्र .............
                                          बाजूच्या वाचन प्रेरणा दिन या gadget  मध्ये दिसत आहेत.